पनवेल येथे २१ रोजी गुरुवंदन कार्यक्रम
परमपूज्य जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त आयोजन
उरण दि. १३ (विठ्ठल ममताबादे ) : वीरशैव लिंगायत समाजाचे धर्मगुरु,परमपूज्य, मौनतपस्वी श्री. म. नि. प्र. जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी, वीरक्तमठ,निंबाळ,अर्जुनगी, समाधान, कलबुर्गी, सोलापूर, बागलकोट, विजयपूर, हुबळी, बेंगळूरू यांच्या 80 व्या वाढदिवसा (अष्टदशमानोत्सव) निमित्त बुधवार दि. 21 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, शिवाजी चौक जवळ, जूना पनवेल, नवी मुंबई येथे गुरुवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी 8 ते 9 या वेळेत इष्टलिंग धारण कार्यक्रम, 9 ते 10 शिवाजी चौक ते नाट्यगृह पर्यंत कुंभ व शोभा यात्रा, 10 ते दुपारी 1 या वेळेत परमपुज्य स्वामीजींचे गुरुवंदन व तुलाभार कार्यक्रम, दुपारी 1 ते 2 परमपुज्य महास्वामीजीचे दर्शन सोहळा व महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पुज्य श्री म.घ.च संगमेश्वर शिवाचार्य महास्वामी पंचमठ गोग्गीहळी जि. शिवमोग्गा, पुज्य श्री म.घ. च. घनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामी हिरेमठ जडे जि. शिवमोग्गा, पूज्य श्री म. नि .प्र सदाशिव महास्वामीजी शिवलिंगेश्वर विरक्त मठ मूडी जि. हावेरी यांच्या पावन सानिध्यात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून नवी मुंबईचे शिल्पकार आ. गणेश नाईक, आ. प्रशांत ठाकूर, माजी आमदार संदिप नाईक, पनवेल महानगर पालिकच्या महापौर कविता चौतमोल, विरोधी पक्षनेता प्रितम म्हात्रे, माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार,सोलापूरचे शिवव्याख्याते शिवरत्न शेटे,शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ वाय बी सोनटक्के, महाराष्ट्र मुख्य संघटक नारायण कंकणवाडी, रायगड जिल्हा प्रमुख विनायक म्हमाणे,महाराष्ट्र वीरशैव महासभेचे उपाध्यक्ष एस. एम. पाटील, महाराष्ट्र वीरशैव सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र बोडके, उद्योगपती शिवलिंगय्या शिवयोगीमठ, शरण संकुल नवी मुंबईचे अध्यक्ष जी. बी रामलिंगय्या यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मुंबई सदभक्त मंडळी आणि शरण संकुल नवी मुंबई यांच्या आयोजनातून हे कार्यक्रम होणार असून इष्टलिंग धारण व तुलाभार सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांनी अमृत परमशेट्टी – मोबाईल नंबर 9869022559, माहांतेश हिरेमठ-9322230400, रविंद्र अटिन- 7303176255, सूर्यकांत इंगळे 99 30077 220, घाळप्पा बिरादार -9970062578, वैशाली पाटील- 7977776215,भिमाशंकर बिराजदार 9029680707 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.