रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या दोन्ही राजधानी एक्सप्रेस आता डिझेल ऐवजी विद्युत इंजिनवर धावणार आहेत. यातील निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी राजधानी एक्सप्रेस दि. २० तर निजामुद्दीन ते मडगाव दरम्यान धावणारी राजधानी एक्सप्रेस 23 सप्टेंबर पासून विजेवर धावणार आहे.
कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे सध्या या मार्गावर मालगाड्या विजेवर चालवल्या जात होत्या. आता टप्प्याटप्प्याने प्रवास रेल्वेगाड्या देखील विद्युत इंजिनवर चालवण्याचे नियोजन रेल्वेने हाती घेतले आहे.
निजामुद्दीन- तिरुअनंतपुरम 12431/12432 तसेच निजामुद्दीन -मडगाव 22413/22414 या दोन्ही एक्सप्रेस आता विजेवर जाणार आहेत.















