धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाटबंधारे विभागाचा निर्णय
रत्नागिरी : राज्याच्या विविध भागात पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे धरण क्षेत्रात पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. महाराष्ट्राची भाग्यरेखा कोयना धरणातून देखील शुक्रवारी 41 हजार क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून कोकण, घाट माथ्यासह विविध भागात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे धरण क्षेत्रात मोठा जलसाठा झाल्यामुळे पाटबंधारे विभागाने अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. कोयना धरणातून देखील शुक्रवारी 41 हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.















