रत्नागिरी दि.19: भारत सरकारने राजा राम मोहन रॉय यांची 250 वी जयंती देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठया प्रमाणात साजरी करण्यासाठी एक विस्तृत योजना आखली आहे. या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून “महिला सक्षमीकरणावर” शालेय मुलांची जनजागृती रॅली आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे.
ही रॅली देशातील 250 जिल्हयांमध्ये किमान 250 शाळकरी मुले, (प्रामुख्याने मुली) शिक्षक आणि स्थानिक नागरीक यांच्या सहभागाने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासकीय विभागीय ग्रंथालय, रत्नागिरी कार्यालयामार्फत गुरुवार 22 सप्टेंबर 2022 रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.
या रॅलीचा 22 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 09:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, मारुती मंदिर, रत्नागिरी येथून सूरु होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे समारोप होणार आहे. रॅलीमध्ये अंदाजे 300 इतका जनसमुदाय (विद्यार्थी, शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी वर्ग) उपस्थित असणार आहे. तरी सदर रॅलीमध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रंथपाल डॉ.विजयकुमार जगताप यांनी केले आहे.














