खारेपाटण विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये आगीचा अचानक भडका

राजापूर, कणकवलीतील अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील अनेक गावांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या खारेपाटण येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या सबस्टेशनमधील एका ट्रान्सफॉर्मरने गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला.

या घटनेनंतर आगीचे मोठ मोठे धुराचे लोंढे आकाशात जाताना दिसत होते. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अचानक ट्रान्स्फॉर्मरमध्ये अग्नितांडव निर्माण झाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. लागलीच कणकवली व राजापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.


याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण येथील विद्युत सबस्टेशनमधील स्टेप डाऊन करणारा ट्रान्सफरमर ICT 220 केव्हीचे 132 मध्ये रुपांतर करणाऱ्या या ट्रान्स्फरमरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याच्यातील ऑइलने पेट घेतल्यामुळे आगीचा एकदम भडका उडाला रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE