https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

दिलखुलास व्यक्तिमत्व डॉ. खालीद शेख यांची एक्झिट

0 63

.

देवरुख (सुरेश सप्रे ) : देवरूखमधील हरहुन्नरी व्यक्तिमत्व व सुप्रसिद्ध डॉ. खालीद शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. देवरूखचे दिलखुलास व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती.

डाँ. खलिद शेख हे बंडमिंटन खेळाडू होते. ते अंत्यंत मनमिळवू व हरहुन्नरी स्वभावाचे होते. डाँक्टर असूनही ते सर्वांमध्ये सहज मिसळून जात असत. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी सर्वांना आपलेसे केले होते. त्यांनी अनेक मित्र जोडले होते. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. देवरूखमधील कोणत्याही कार्यक्रमात ते अगदी हिरहिरीने सहभागी होत असत. त्यांना बँडमिंटन खेळाची विशेष आवड होती. ते संगमेश्वर तालुका बँडमिंटन असोसिएशनचे पदाधिकारी होते. बँडमिंटन स्पर्धा घेण्यामध्ये ते पुढाकार घेत असत.

रात्री ७ वाजण्याच्या सुमारास बँडमिंटन कोर्टवर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्वरीत चोडणकर हाँस्पिटला हलविण्यात आले.तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी देवरूखसह संपुर्ण संगमेश्वर तालुक्यात समजताच सारेच हळहळले. त्यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवाराला फार मोठा धक्का बसला आहे. त्यांची अचानक एक्झीट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने देवरूखमधील हरहुन्नरी व्यक्तीमत्व व सच्चा दिलाचा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी मंत्री रविंद्र माने. रोहन बने. सौ. नेहा माने. नृत्यांगना सौ. शिल्पा मुंगळे. देवरूख शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत. हनिफ हरचिरकर. मंगेश प्रभुदेसाई.बंडमिंटन असोसिएशन व सर्व डाँक्टर. मित्रपरिवार यांनी हाँस्पिटला धाव घेतली.त्यांचे पार्थिव देवरूखमधी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून आज रविवारी सकाळी १२ वा. देवरूख कब्रस्थानमधील दफनभुमीत त्यांच्या पार्थिवाचे दफन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना देवरूखवासियांकडून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी डाँ. सुनिता, मुलगी निदा असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.