‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी हिंदू मुलींना धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची गरज : मनोज खाडये

रत्नागिरी, ११ ऑक्टोबर : गेल्या काही वर्षांत देशभरात लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे लैंगिक शोषण आणि त्यांच्यावर बळजोरी करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. धर्मांधानी चालवलेला हा लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदू युवतींना धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियानांतर्गत श्री मरुधर विष्णू समाज भवन येथे नवरात्रनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. खाडये बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पू. संत अनुजदासजी यांची वंदनीय उपस्थिती होती.
लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू तरुणींभोवती योजनाबद्धपणे प्रेमपाश आवळले जातात. तिला विवाहाचे वचन दिले जाते. विवाहानंतर बळजोरीने तिचे
धर्मांतर करण्यात येते. मुलगी विरोध करत असल्यास तीचा छळ करण्यात येतो, तिच्यावर अत्याचार करण्यात येतात, मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते आणि अखेर अरब देशात तिची विक्री करण्यात येते. ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात अडकल्याने मुलगी एका अशा दुष्टचक्रात अडकते की, त्यातून तिची सुटका होणे अशक्य होते. कोणत्या जातीच्या हिंदु युवतीशी निकाह करून तिचे धर्मांतर केल्यास किती लाख रुपये मिळणार त्याचे दरपत्रकही तयार करण्यात आले आहे. बाजाराला गेलेल्या हिंदु महिलांच्या शेजारी उभे राहून त्याचे छायाचित्र काढून त्याद्वारे हिंदु महिलांना धर्मांध ब्लॅकमेल करून त्यांचा एटीएम कार्डसारखा वापर करतात. मोबाईल रिचार्जच्या दुकानातून हिंदु युवतींचे भ्रमणभाष क्रमांक मिळवून त्यांच्याशी जवळीक निर्माण करून फसविले जाते. हे प्रकार रोखण्यासाठी हिंदु पालकांनी दक्ष रहाणे आवश्यक आहे. लव्ह जिहादमध्ये फसत चाललेल्या युवतींचे प्रबोधन करणे आणि धर्मांधांकडून केल्या गेलेल्या तांत्रिक प्रयोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी गोमूत्र प्राशन करण्यास देण्यासारखे अध्यात्मिक उपाय प्रभावी ठरतात, अशी माहितीही श्री. मनोज खाडये यांनी दिली.
या व्याख्यानप्रसंगी सर्वश्री दीपकसिंह देवल, रवींद्रसिंह राणावत, धनराज चौधरी आदींसह ३०० श्री मरुधर विष्णू समाज बांधव उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE