रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या कार्यालयाचा ना. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी : येथील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स ही संस्था गेले अनेक वर्षे साहस व समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आली आहे.

या संस्थेचे कार्यालय शिवाजी स्टेडियम येथे उघडण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थित होते. यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. तसेच यांच्यासमवेत रनप मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगरसेवक दत्ताराम साळवी, माजी नगरसेवक निमेश नायर, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, आर्किटेक्ट संतोष तावडे, चेअरमन पर्यटन समिती, पेडणेकर उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE