संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावातील पुलाचे भूमिपूजन

चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

देवरूख (सुरेश सप्रे) : आमदार झाल्यानंतर विकास कामे करणे सोपे जाईल व आपणास कोणतेही यामध्ये अडथळे येणार नाहीत, असे वाटत होते. मात्र, या गोष्टी करणे एवढे सोपे नाही. आजकाल कुणीही येतो आणि माध्यमांद्वारे कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतो परंतु ही कामे एक अन दोन दिवसात पत्र देऊन मंजूर करता येत नाहीत किंवा एखादे आदोलन करुनही लगेच मंजूर होत नाही तर यासाठी सततचा पाठवपुरावा करावा लागतो. जनतेच्या हिताची कामे करताना राजकीय फायदा तोट्याचा विचार मी करीत नाही. म्हणूनच काही जण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, असे रोखठोक प्रतिपादन आम. शेखर निकम यांनी केले.


संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावात जाणे येण्यासाठी लोखडी ब्रीज वरुन प्रवास कराव लागत असे. प्रवासाच्या दृष्टीने तो ब्रीज धोकादाय ठरत होता. निवधे गावला दळणवळणाचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात भेडसावत होता तसेच निवधे येथे पुल झाला तर बामणोली, निवधे, साखरपा गाव जोडले जाणार आहेत त्यांचा फायदा मार्लेश्वर मध्ये येणा-या घाटमाथ्यावरुन पर्यटकांना चांगला होणार आहे व पर्यटनाच्या दृष्टीने फायद्याचे होणार असल्याने हा पूल होणे आवश्यक होते.

आमदार शेखर निकम हे पावसाळ्यात कार्यक्रमासाठी निवधे कार्यकर्त्यांसोबत पहाणी केली त्यावेळीच मारलेश्वर चरणी प्रार्थना केली की यदाकदाचित या मतदारसंघाचा आमदार होण्याची संधी लाभली तर या निवधे येथील पूल बांधण्यासाठी निश्चय केला.

2019 साली शेखर निकम आमदार झाले. त्यानंतर प्रथमच केंद शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी (CRF) मधून क्षणाचा विलंब न करता निवधे पुलाचे काम सुचवले आम. निकम यांनी मतांचा विचार न करता एका गावाचा विचार केला काराण हा पुल आता झाला नाही तर परत कधीही होणार नाही. यासाठी हा निधी पुरणारा नव्हता तरी आपल्या ओळखीने जास्तीचा निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले आणि केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत (CRF) 2020-21 मधून रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील रा. मा. 174 मारळ ते निवधे कळकदरा जाधववाडी साखरपा ते रा.म.मा. 166 शाखेसह रस्ता प्र.जि.मा. 100 वर कि. मी. 0/400 मध्ये बावनदीवर मोठया पुलाचे बांधकाम करणेसाठी रु. 3 कोटी 97 लाखाचा निधी मंजूर करुन आणला व आज त्यांचे भूमिपुजन संपन्न झाले. यावेळी माजी मंत्री रवी माने माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

कामाचे श्रेय कुणी घ्यावे हे महत्त्वाचे नसून ते काम पाठपुरावा करुन मंजूरी आणून पुर्ण करणे आणि कोणत्याही पक्षाचे राजकारण न करता ते सर्वानी एकत्र येऊन प्रत्येक गावाचा व त्याद्वारे मतदार संघाचा विकास करणे हे महत्वाचे आहे. राजकारण हे एक दिवसापुरते असते मात्र आपणास विकास करणेसाठी लोकांच्या सानिध्यात राहून त्यांच्या माध्यमातून कायम विकासाठी प्रयत्न करावे लागत असतात. आत्ताच नाही तर यापुढेही कोणतही राजकारण न करता मी प्रत्येक गावाचा व मतदार संघाच्या विकासासाठी कठीबद्ध असेन असा विश्वास हि दिला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE