लांजा-राजापूर तालुक्यातील १२५ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचं वाटप

रत्नागिरी : सामाजिक न्याय विभागातर्फे 26 नोव्हेंबर 2022 संविधान दिन ते 06 डिसेंबर 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे.

समता पर्वाच्या निमित्ताने आज राजापूर हायस्कूल येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते येथील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 125 वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. या कार्यक्रमाला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा डॉ. ज्योत्स्ना पडियार, प्रांतधिकार राजापूर वैशाली माने, राजापूरच्या तहसिलदार शीतल जाधव, राजापूर कॉलेजचे प्राचार्य प्रकाश साळवी आदि उपस्थित होते.
            या कार्यक्रमात राजापूर व लांजा तालुक्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
            या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजापूर हायस्कूलचे आपटे  यांनी केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE