खेड : तालुक्यतील केंद्रीय शाळा देवघर निवाची वाडीचा विद्यार्थी वेदांत विठ्ठल मोरे याची ‘जाणू विज्ञान,अनुभवू विज्ञान’ या जि.प.च्या उपक्रमांर्तंगत परीक्षेतून रत्नागिरी जिल्ह्यातून ‘नासा’ व ‘इस्रो’ला जाण्यासाठी निवड झाल्याबद्दल जेसीआय खेड व पराग मोबाईल चे मालक तथा खेड जेसीज् चे माजी अध्यक्ष पराग पाटणे यांच्या वतीने त्याला दि.30 डिसेंबर ला एंड्रॉइड मोबाईल भेट म्हणून देण्यात आला.
वेदांतच्या ह्या यशामध्ये त्याची मेहनत आहेच परंतु त्याचे शिक्षक सौ.विधी बने आणि मोहन चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या समारंभास खेड जेसीज् चे अध्यक्ष प्रथमेश खामकर, सचिव आशिष रेपाळ, वैभव बने आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

