
रत्नागिरी : जिल्ह्यातील पोलीस दलात भरावयाचा रिक्त कर्मचारी पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील मध्यवर्ती मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस दलात भरावयाच्या रिक्त पदांसाठी गृह विभागाकडून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया या आधीच राबवण्यात आली. यानुसार आता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय प्रक्रिया शिस्तबद्धपणे पार पडावी, यासाठी पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
