https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

उरणमध्ये मनसे पदाधिकार्‍यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

0 78


कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांची खबरदारी

उरण (विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वत्र हनुमान चालीसा वाचण्याचे आदेश दिले होते. व अनधिकृत भोंगा विषयी आवाज उठवा असा आदेश औरंगाबादच्या सभेत दिला होता.4 मे पासून कोणतेही परिस्थिती उदभवेल असा इशारा राज ठाकरे यांनी भर सभेत दिला होता.त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त केला आहे. उरण तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. समाजात शांतता प्रस्थापित राहावी या दृष्टीकोणातून उरण पोलीस ठाण्यातर्फे मनसेच्या पदाधिकार्‍यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमविर दि. 4 मे 2022 रोजी उरण पोलीस ठाणे हद्दीतील
1) संदेश बालचंद्र ठाकूर, वय-50 वर्ष, रा- नयन अपार्टमेंट उ विंग, रूम न. 4, पहिला मजला उरण , जि. रायगड.
पद – रायगड जिल्हा अध्यक्ष मनसे.

2) अल्पेश अशोक कडू, वय-39 वर्ष, रा.सोनारी, ता.उरण, जि.रायगड
पद – महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मनसे वाहतूक सेना.

3) मंगेश जनार्दन वाजेकर, वय-49 वर्ष, धंदा-व्यवसाय, रा. जसखार, ता. उरण, जि. रायगड,
पद – उरण तालुका उपाध्यक्ष मनसे.

4) सतीश बिपीन पाटील, वय-33वर्ष, रा-नागाव घोसपाडा रामचंद्र अपार्टमेंट, दुसरा मजला रूम नंबर-201, उरण, ता. उरण, जि. रायगड.
पद – उरण तालुका संघटक मनसे
5) रितेश विष्णू पाटील, वय -44, रा. बोकडविरा, मराठी शाळेचे पाठीमागे, उरण, ता- उरण, जि. रायगड.
पद – रायगड उप-जिल्हा संघटक मनसे

असे या प्रकरणी मनसे पदाधिकारी/कार्यकर्ते यांना 11.05 वा. च्या दरम्यान मनसे कार्यालय वाणीआळी, उरण, ता.उरण, जि.रायगड या ठिकाणाहून ताब्यात घेऊन सी.आर.पी.सी. 151 (1) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.अशी माहिती सुनिल पाटील – वरिष्ठ पोलीस निरिक्षक उरण पोलीस ठाणे, नवी मुंबई यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.