मंडणगड – तिडे -तळेघर ठाणे -नालासोपारा बससेवा सुरु
o
मंडणगड : तिडे तळेघर गृप ग्रामपंचायत व राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीवरून मंडणगड तिडे तळेघर ठाणे नालासोपारा अशी बससेवा ७ मे पासून सुरू करण्यात आली आहे.
ही बस मंडणगड येथून स ०७.४६ वा सुटून तिडे,तळेघर,शेनाळे, तुडील, महाड,माणगाव, रामवाडी, पनवेल, कोकण भवन नेरूळ, ठाणे खोपट, घोडबंदर, वसई फाटा, नालासोपारा येथ ०३.३१ वा पोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता नालासोपारा येथून स.०६:३१ वा सुटणार आहे
या बसचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडणगड खेड दापोली विधान सभा आमदार योगेश दादा कदम, प्रादेशिक वाहतूक महाव्यवस्थापक श्सुहास जाधव, उप महाव्यवस्थापक (पुणे व कोकण) अजित गायकवाड, प्रादेशिक विभाग नियंत्रक सौ. यामिनी जोशी,
विभाग नियंत्रक- प्रज्ञेश बोरसे साहेब,विभागिय वहातुक अधिकारी-अनिल मेहत्तर,
विभागीय वहातुक अधिक्षक-अनंत जाधव, सचिन सुर्वे,
यंत्र अभियंता-प्रमोद जगताप,
मंडणगड आगारव्यवस्थापक हनुमंत फडतरे,कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनिल सिताराम उत्तेकर,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना संतनगरी शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले, राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर, तिडे तळेघर गृप ग्रामपंचायत सरपंच दादा पांढरे, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रवासीवर्ग आदी मान्यवरांनी केले आहे.