दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पश्चिम विभाग विजेता

चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन दिवसीय शाखांतर्गत क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभाग संघाने विजेतेपद तर लगान इलेव्हन संघाने उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धा 30 एप्रिल व 1 मे यादिवशी पवन तलाव मैदानावर विद्युतझोतात खेळविण्यात आल्या.
विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन सूर्यकांत खेतले, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, संचालक अशोक कदम, संचालिका स्मिता चव्हाण, संचालक गुलाब सुर्वे, रवींद्र भोसले, अशोक साबळे, सत्यवान म्हामूनकर, सोमा गुडेकर, संचालिका अ‍ॅड. नयना पवार, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, माजी आ. रमेश कदम, जयंद्रथ खताते, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी सामनावीर आदित्य माळी, उत्कृष्ट फलंदाज शैलेश शिर्के, उत्कृष्ट गोलंदाज सुहास कडव, क्षेत्ररक्षक हृषिकेश जड्याळ यांना गौरविण्यात
आले.
स्पर्धेचे यशस्वी नियोजन करणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव व सर्व कर्मचार्‍यांचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी कौतुक केले. स्पर्धेसाठी पंच म्हणून राकेश मोरे, रवींद्र आदवडे, सुनील कुळे, विक्रम भोसले, स्कोअरर म्हणून प्रसाद लांबे यांनी काम पाहिले. प्रशांत आदवडे, अमित आदवडे यांनी समालोचन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE