राज्यातील आदर्श जिल्हा समन्वय समित्यांचा मान्यवरांच्या हस्ते होणार गौरव
अलिबाग : दि. 7 फेब्रुवारी 1986 रोजी स्थापन झालेल्या अधिकारी महासंघाच्या 37 व्या वर्धापन दिनाचे परिषद सभागृह, 6 वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे मंगळवार, दि.7 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
या वर्धापन दिन कार्यक्रमात अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मान्यवरांच्या निदर्शनास आणून त्यावर अभ्यासपूर्ण चर्चा होणार आहे. तसेच कल्याणकेंद्र निधी संकलनाचे उत्तम कार्य केलेल्या पुणे, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, अमरावती, रायगड, नागपूर, नवी मुंबई, रत्नागिरी, बीड या आदर्श जिल्हा समन्वय समित्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त अधिकारी वर्गाने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन असे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, अध्यक्षा, दुर्गा महिला मंच डॉ.सोनाली कदम, कोषाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर यांनी केले आहे.
