32 वी महाराष्ट्र राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 12 फेब्रुवारीपासून
रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व वर्धा जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा दि. 12ते 14 फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा वर्धा जिल्हामधील पुलगाव लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे होणार आहे. या राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटर नाचणे ओम साई मित्र मंडळ येतील तायक्वांडो प्रशिक्षण वर्गातील सात खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे. 1)अद्वेत सिंग. 2) सई सूवरे, 3) भार्गवी पवार, 4) योगराज पवार, 5) श्रुती काळे., 6)तुषार पाटील. 7) नूपुर दप्तरदार. विजेते सर्व खेळाडूंना प्रशिक्षक तेजकुमार लोखंडे (2 दान ब्लॅक बेल्ट कोरिया) अमित जाधव (1दान ब्लॅक बेल्ट कोरिया), महिला प्रशिक्षक सौ.शाशिरेखा कररा, कु. मयुरी कदम (1दान ब्लॅक बेल्ट ) याचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग असणार आहे सदर राज्य स्पर्धा करिता निवड खेळाडूंना युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर अध्यक्ष राम कररा रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन कोषाध्यक्ष (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री वेंकटेश्वरराव कररा जिल्हा महासचिव श्री. लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
