एमजीएम हॉस्पिटल वाशी येथे अंतिम बिलामध्ये रुग्णांना 15 टक्के सूट

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश

उरण(विठ्ठल ममताबादे) : गरिबांना दिवसेंदिवस जगणे कठीण झाले आहे. महागाईने तर सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे.अशातच गोरगरीब व गरजू रुग्णांकरिता अंतिम बिलात सवलत मिळावी यासाठी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल पाटेकर यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत एमजीएम हॉस्पिटल वाशी नवी मुंबई उरण मधील गरीब व गरजू लोकांसाठी अंतिम बिलात 15% सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
अंतिम बिलात 15 टक्के सूट देण्यात येईल असे अधिकृत पत्र विशाल पाटेकर यांना प्राप्त झाले असून याचा फायदा समाजातील दुर्बल घटका पर्यंत पोहोचणार आहे. मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण या संस्थेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्याने उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE