देवरुखच्या न्यू इंग्लिश स्कूलचा ज्ञानसमृद्धी पुरस्काराने गौरव


पुण्यातील आय.आय.बी.एम. संस्था चिखली, पुणे आयोजित स्पर्धा

देवरुख : शहरातील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयामध्ये आय.आय.बी.एम. संस्था चिखली, पुणे या संस्थेमार्फत निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धेअंतर्गत विद्यालयास ज्ञानसमृद्धी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार विद्यालयाचे प्राचार्या सौ. माया गोखले व त्यांच्या सहकारी शिक्षकांना आय. आय. बी. एम. चे प्रमुख अमोल भागवत व प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच विद्यालयामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आय.आय. बी. एम. कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत, प्रशासकीय प्रमुख कु. प्रतीक्षा डफळ, प्रेरणा कनावजे, पूजा पंदीरकर, शहाबाज काजी, संकेत रोडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मनोगतातून प्राचार्य सौ. माया गोखले यांनी विद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व विद्यालयास मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्राचार्य व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. प्राचार्य सौ. माया गोखले यांनी हा पुरस्कार माझा नसून तो संस्थेचा, माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा आहे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE