Ultimate magazine theme for WordPress.

नियंत्रण सुटलेल्या एनएमएमटी बसने दुचाकीस्वारांना चिरडले!

0 208
  • खोपटे येथे भीषण अपघात ; एकाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक

उरण दि८ ( विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यातच अपघात होऊन वाढणारी मृत्युची संख्या चिंताजनक आहे. बस चालकाचे आपल्या वाहणावरील नियंत्रण सुटल्याने जुईनगर नवी मुंबई येथून आलेल्या एन एम एम टी बसने उरण तालुक्यातील खोपटा रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या दोन मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघात मोटारसायकल स्वार निलेश शशिकांत म्हात्रे यांचा नवी मुंबई मधील हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे तर केशव ठाकूर हे गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नवीमुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच खोपटा गावातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करुन सदर चालकावर व संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान उरण विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना शासनाकडुन योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

एन एम एम टी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील एन एम एम टी बसने खोपटा- कोप्रोली रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या दोन मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी ( दि ८) सकाळी ठिक १०-३० च्या सुमारास घडली.या झालेल्या अपघात पाच मोटारसायकल स्वार थोडक्यात बचावले असले तरी दोन मोटारसायकल स्वारांना फडफडत नेल्याने झालेल्या अपघात निलेश शशिकांत म्हात्रे यांचा मृत्यू झाला आहे.तर केशव ठाकूर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नवीमुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.तर एन एम एम टी बस मधिल प्रवाशी नागरीकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.मात्र संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करुन भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची तसेच वारंवार होणाऱ्या अपघाता मयत, जखमी नागरिकांना भरपाई देण्याची मागणी केली.यावेळी सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, शिवसेना उरण तालुका प्रमुख महेंद्र पाटील, बीजेपी कार्यकर्ता प्रशांत रमेश ठाकूर, खोपटा गाव अध्यक्ष निलेश भगत, उपसरपंच रितेश ठाकूर, माजी उपसरपंच सुजित म्हात्रे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,बीजेपी कार्यकर्त्या कोळी मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद ठाकूर, बीजेपी कार्यकर्ता देवेंद्र पाटील,प्रदीप ठाकूर, बीजेपी कार्यकर्ता नवनाथ ठाकूर,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, सामाजिक कार्यकर्ते कैलास म्हात्रे यांनी या वारंवार होणाऱ्या अपघाता बदल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सदर मयत व्यक्तींच्या कुटुंबाना व जखमी व्यक्तींना योग्य ती मदत मिळावी, त्यांना न्याय मिळावा यासाठी वरील सर्व मान्यवर प्रयत्नशील आहेत.मात्र खोपटा चिरनेर कोप्रोली या मार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस बॅरिगेट्स बसवावेत. योग्य ठिकाणी गतिरोधक हवेत. प्रत्येक कंपनीच्या सुरक्षाराक्षकांनी वाहने व्यवस्थित पास होतात की नाही याची काळजी घ्यावी. खोपटे कोप्रोली चिरनेर मार्गावर सुरक्षा रक्षक नेमावेत. वाहने येण्यासाठी व वाहने जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावा. रस्ता चार पदरी करावा.पोलीस प्रशासनातर्फे चुकीच्या पद्धतीने वाहन चालवीणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.अशी विविध मागणी ग्रामस्थांनी , विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक संस्था संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.