रत्नागिरी समुद्रात पडून बेपत्ता झालेली तरुणी नाशिकमधील? तपास सुरु

रत्नागिरी : दोन दिवसांपूर्वी येथील भगवती किल्ल्यावरील सनसेट पॉईंटवरून समुद्रात कोसळलेली तरुणी ही नाशिकमधील असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.


रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावरून समुद्रात पडून खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झालेला तरुणीचा अद्यापही शोध सुरूच आहे. स्थानिक पातळीवरून या संदर्भात या वर्णनाची तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार कोणीही केलेली नाही. याचदरम्यान नाशिकमधील एका बेपत्ता तरुणीशी या घटनेतील तरुणीचे वर्णन काहीसे जुळत असल्याने येथील समुद्रात पडून बेपत्ता झालेली तरुणी हीच आहे का, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


सध्या समुद्र खवळलेला असल्याने घटनास्थळावरच लगतच्या समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांनी शोध घेणे सुरू ठेवले आहे. मात्र, किल्ल्यावरून पडून समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध दोन दिवसानंतरही लागलेले नाही.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE