उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी संजीव धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभारही स्वीकारला आहे.
उरणमधील शासकीय अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू आहे. त्यामध्ये उरण पोलीस ठाण्याचे वपोनि सुनील पाटील, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वपोनि मधुकर भटे यानंतर उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांचीही उरणहून बदली झाली आहे. अशा प्रकारे काही दिवसांच्या अंतराने प्रथमच तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांची बदली झाल्याने त्या जागी संजीव धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

