


ठाणे : दिवा शहरातील असंख्य कोकण रेल्वे प्रवाशांनी संगमेश्वर रोड येथे नेत्रावती व मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडयांना थांबा मिळावा म्हणुन गेले तीन वर्षे लाऊन धरलेल्या मागणीला जोरदार प्रतिसाद देत याविषयी संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीच्या मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांना पत्रे लिहुन मागणी केली आहे.
रविवारी दिवा शहरातील कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी अवघ्या दोन तासात सुमारे 1743 मागणीपत्रे तयार करून देऊन उत्स्फुर्द प्रतिसाद दिला. अजूनही हजारो प्रवासी अशी मागणीपत्र देणार असून, ती लवकरच रेल्वे राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवण्यात येतील असे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.
