कोकण हापुस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थेची मागणी
रत्नागिरी : आंबा हंगामात कोकण रेल्वे स्थानकांवर हापूस आंबा विक्रीसाठी देण्यात येणारे स्टॉल कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकरी किंवा त्यांचे अधिकृत विक्रेते यांनाच द्यावेत. त्यासाठी आवश्यक पुरावा घ्यावा, अशी मागणी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून या संदर्भात कोणती पावले उचलली जातात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.














