रत्नागिरी : श्रीराम नवमिनिमित्त काल गावडे आंबेरे येथे टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कुलच्या मुलींचा टेनिस क्रिकेट स्पर्धेतील संघ उपविजेता ठरला.या संघास रणरागिणी चषक व रोख पाच हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.
या संघात संचिता जाधव,सलोनी धातकर,रिया सावंत,सानिका आलिम,सायली जाधव,आश्लेषा लोकरे, वेदिका लोकरे, पूजा कुर्टे, शिवानी गोरे,सानिका धनावडे,दिक्षा चव्हाण, प्रतिभा आखाडे या सहभागी झालेल्या होत्या. या संघास सौ. ऋतुजा जाधव यांनी मार्गदर्शन केले. या संघाचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी अभिनंदन केले.















