अर्जुना नदीतील गाळ काढण्यासाठी नीलेश राणे यांनी दिला पोकलेन

रायपाटणवासियांनी मानले आभार

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीमध्ये साचलेल्या गाळामुळे पुराची समस्या वाढली असून गतवर्षी आलेल्या महापुराचा फटका रायपाटणसह लगतच्या गावांना बसला होता. त्यामुळे अर्जुना नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याकडे केली होती. निलेश राणे यांनीही संभाव्य धोका लक्षात घेऊन रायपाटण अर्जुना नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतं ग्रामस्थांना एक पोकलेन तत्काळ उपलब्ध करून दिला आहे. यामुळे ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या तत्काळ प्रतिसाद देत केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहेत.

राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीतील गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला असून गतवर्षी या साचलेल्या गाळामुळे अर्जुना नदीला अनेवेळा पूर येऊन पूरस्थिती निर्माण होत दोन ते तीन बळी या पूरामुळे गेले. त्यामुळे रायपाटण येथिल ग्रामस्थांनी निलेश राणे यांची या नदीतील गाळ उपसासंदर्भात रविवारी राजापूर शासकिय विश्रामगृह येथे भेट घेतली व निवेदन दिले होते. .

या निवेदनात सरपंच महेंद्र गांगण यांनी या गाळ उपशाबाबत आपण याकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधुनही गाळ उपशाबाबत कार्यवाहीबाबत चालढकल केली जात असल्याचे नमुद केले होते.यावर निलेश राणे यांनी आपण या प्रश्नी स्वत: लक्ष घालून पावसाळयापुर्वी हा गाळ काढण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासांची तत्काळ पूर्तता करत निलेश राणे यांनी अर्जुना नदीतील गाळ काढण्यासाठी ग्रामस्थांना पोकलेन उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे गाळ काढण्याच्या कामाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. यावेळी याप्रसंगी रायपाटणचे ग्रामस्थ तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, समिर खानविलकर, रायपाटण सरपंच महेंद्र गांगण, मनोज गांगण, भास्कर गांगण, रवींद्र गांगण, हरिश्चंद्र पांचाळ, आंबा गांगण, प्रसाद पळसुळे देसाई, भाई गांगण, प्रकाश पाताडे, रामदास गांगण, तात्या गांगण, अरविंद लांजेकर, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी खासदार निलेश राणे यांच्या तत्काळ प्रतिसादाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आभार व्यक्त केले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE