रत्नागिरी मिरकडवाड्यातील अतिक्रमण हटविण्यावर पालकमंत्र्यांकडून स्थगिती

रत्नागिरी : येथील मिरकरवाडयातील जागा ही मत्स्य विभागाच्या मालकीची असून त्यावर झोपडपट्ट्या, दुकाने, चहाच्या टपऱ्या अशा वेगवेगळे स्टॉल बांधून त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले होते. ते अतिक्रमण हटवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडून नोटीस बाजवण्यात आली होती.

या संदर्भात मच्छिमारांनी मंगळवारी रत्नागिरी -रायगडचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेवून त्या संदर्भात चर्चा केली.त्यावेळेस मच्छिमारांचे समास्या समजून घेवून अतिक्रमण हटवण्या पूर्वी मच्छिमारांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा असा आदेश दिला आहे. तो पर्यत या नोटीशीला पालकमंत्री यांनी स्थगिती दिली आहे. यावेळी मिरकरवाड्यातील सर्व मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरकरवाड्यातील स्थानिक मच्छीमारांची चर्चा करताना पालकमंत्री उदय सामंत.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE