डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचा जागर कार्यक्रम

 

अलिबाग : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.1 एप्रिल ते दि.1 मे 2023 या कालावधीत सामाजिक समता पर्व अभियानांतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रमांचा जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनील जाधव यांनी केले आहे.


या विविध उपक्रमांच्या जागर कार्यक्रमामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या व मातंग समाजाच्या वस्त्यांना भेटी देणे, त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणे, रमाई आवास योजनेतून मातंग समाजासाठी घरकुले मंजूर करणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जाती पडताळणी समिती कार्यालये यांनी शिक्षण विभागाशी समन्वय करुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करणे, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, निवासी शाळा, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करणे, जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत प्रबोधर करणे, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेणे, जिल्हा व तालुका स्तरावर महात्मा फुले जयंती साजरी करणे, वक्त्यांना आमंत्रित करून व्याख्यानपर कार्यक्रमाचे नियोजन करणे, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे, संविधान जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे, सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम, व्याख्यान, चर्चासत्र इतर साजरे करणे, जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे, समान संधी केंद्रामार्फत नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्तीच्या योजनांच्या माहिती संदर्भात विशेष अभियान राबविणे, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, सफाई कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य शिबिर, जनजागृती शिबिर, मेळावा व कार्यशाळा आयोजित करणे, समान संधी केंद्रांतर्गत महात्मा फुले जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन साजरा करणे असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनील जाधव यांनी कळविले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE