रत्नागिरी : तिरूनेलवेली – जामनगर एक्सप्रेस या कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाडीला दिनांक ७ व ८ एप्रिल 2023 रोजी च्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रतीक्षा यादीवरील तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना उन्हाळी हंगामामुळे गर्दी होऊ लागली आहे. ‘कोरे’ मार्गावरील गाड्यांचे आरक्षणाची ही परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वेने जामनगर ते तिरूनेलवेली या मार्गावर धावणाऱ्या (19578) या गाडीला दिनांक ७ व८ एप्रिल च्या फेरीसाठी तर उलट दिशेच्या प्रवासासाठ (19577) म्हणजेच तिरुनेलवेली ते जामनगर या फेरीसाठी दिनांक दहा 10 व 11 एप्रिल रोजी स्लिपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.
दरम्यान गर्दीच्या हंगामात अतिरिक्त डबा जोडल्यामुळे या गाडीची आरक्षणे असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.















