रत्नागिरी : फेब्रुवारी २०२३ मध्ये पोलीस विभागातील विविध विषयांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मासिक गुन्हे आढावा बैठकीचे निमित्त साधून पोलीस खात्यात काम करताना आपलं कर्तव्य चोखपणे बाजवणाऱ्या अधिकारी तसेच अंमलदार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली.














