स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाची रत्नागिरीत उद्या सांगता

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सावरकर विचार या ग्रंथ सप्ताहाची दिनांक 28 मे रोजी रत्नागिरी सांगता केली जाणार आहे. यानिमित्त पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 28 मे रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार 28 मे 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या इंग्रजी Dhananjay Keer- Life Sketch Of A Great Biographer व चरित्रकार धनंजय कीर या चरित्र ग्रंथाचे मराठी सुधारित आवृत्तीचे प्रकाशन (लेखक : श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर) सोहळ्यास उपस्थिती.( स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 2.00 वाजता सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : माध्यमिक शिक्षक कर्मचारी पतसंस्था, साळवी स्टॉप, रत्नागिरी).

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE