रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील आंदोलनकर्त्यांना बजावलेले मनाई आदेश प्रशासनाकडून रद्द

रत्नागिरी : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी एम देवेंदर सिंह यांनी जारी केलेल्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्याना रत्नागिरी जिल्हयामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला होता. हे जारी केलेले आदेश क्र. जिविशा/रिफायनरी प्रकल्प/3245-3250/2023 पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या दि.11 मे 2023 पत्राच्या अनुषंगाने मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.


ज्या व्यक्तींना मनाई आदेश जारी करण्यात आले होते व हे आदेश आता रद्द करण्यात आले, त्या संबंधित व्यक्तींची नावे व पत्ता- 1) देवाप्पा अण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी, रा.अर्जुनवाड रोड, ता. शिरोळ जि. कोल्हापूर, खासदार व अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना 2) जनार्दन गुंडू पाटील, रा.परीते, ता.करवीर, जि. कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संघटना, कोल्हापूर 3) अशोक केशव वालम, रा. नाणार, ता. राजापूर जि. रत्नागिरी 4) जालिंदर गणपती पाटील, रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर 5) स्वप्निल सिताराम सोगम, रा. पन्हळे तर्फे राजापूर, ता. राजापूर जि. रत्नागिरी 6) सत्यजित विश्वनाथ चव्हाण, रा.राम आंनद नगर हौसिंग सोसायटी, दहिसर पूर्व, मुंबई.


संबंधित रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE