पोरबंदर-कोचुवेली एक्सप्रेसलाही तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबा

रत्नागिरी : उन्हाळी हंगाम तसेच शाळा महाविद्यालयांना असलेल्या सुट्ट्या त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांचे कन्फर्म तिकीट मिळणे अवघड झाले आहे. या मार्गावरील ही परिस्थिती लक्षात घेऊन दोन एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 22908 व 22907 हापा-मडगाव एक्सप्रेसला हापा येथून सुरू होणाऱ्या फेरीसाठी 17 मे 2023 तर मडगाव ते हापा या फेरीसाठी दिनांक 19 मे 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे.
याचबरोबर 20910 व 20909 या क्रमांकांनी धावणाऱ्या पोरबंदर ते कोचुवेली पोरबंदर येथून दिनांक 18 मे रोजी तर कोचुवेली ते पोरबंदर या फेरीसाठी दिनांक 21 मे 2023 रोजी स्लीपर चा एक जादा डबा जोडण्यात येणार आहे. ऐन गर्दीच्या हंगामात हा निर्णय घेण्यात आल्यामुळे या गाडीच्या प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
