आदर्श शिक्षक संजय होळकर गुरुजी यांना मानाचा समाजभूषण रत्न पुरस्कार प्रदान

शिवस्वराज्य प्रतिष्ठानकडून पुरस्काराचे वितरण

उरण (विठ्ठल ममताबादे ) : दि.19/5/2022 रोजी वाकण गावाचे ग्रामदैवत काळकाई मातेच्या वार्षिक सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या प्रथम वर्धापन दिनी साने परिवार व वाकण गावातील विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा काळकाई मंदिर सभागृह,वाकण, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये वाकण गावाचे सुपुत्र आदर्श शिक्षक,द्रोणागिरी भूषण, अविरत चित्रपट कलाकार  व उरण तालुक्यातील मोठी जुई येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे संजय जयराम होळकर यांचा विशेष सत्कार करून शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थे तर्फे मानाचा समाजभूषण रत्न पुरस्कार सद्गुरू भावे महाराज वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य मठाधिपती रायगड भूषण ह.भ. प.श्री.दादामहाराज घाडगे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत वाकण सरपंच श्रीम.ज्योती सालेकर मॅडम,माजी सरपंच संजय मोदी,ह.भ. प.माजी सैनिक तात्याबा साने,माजी सैनिक नामदेव साने,अनिता साने (पोलीस पाटील),गंभीरे मॅडम ग्रामसेविका वाकण जयराम साने,निवृत्ती साने,दाजी साने,जयराम होळकर,सुरेश साने,अशोक साने,विठोबा साने,लक्ष्मण महाराज साने,विश्राम साने,सुजाताताई होळकर माजी सरपंच वाकण राम उतेकर, सोनू जाधव  आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन या प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष निळकंठ साने यांनी सुंदर रित्या केले होते. त्यामुळे या प्रतिष्ठानचे आभार मानून पुढील काळात यापेक्षा अधिक प्रमाणात विविध उपक्रम राबविण्यात यावेत यासाठी विविध मान्यवरांतर्फे शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय होळकर गुरुजी यांनी केले.उरण मधील मोठी जुई येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आदर्श शिक्षक संजय होळकर यांना समाजभूषण रत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून, विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE