लांजातील आरोग्यसेवेतील हेळसांडीबाबत जनता दरबारात गंभीर दखल

लांजा : लांजा ग्रामीण रुग्णालयतील आरोग्य सेवांच्या हेळसांड बाबत सोमवारी झालेल्या जनता दरबारात पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिह यांनी गंभीर दखल घेत 15 दिवसात सर्व आरोग्य सुविधा सुधारण्याचे आदेश दिले. 25 कोटी रुपये निधी मंजूर झालेले नवीन बांधकाम त्वरित सुरू करण्यात येणार आहे.

पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या ढिसाळपणा,अस्वच्छता बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही 15 दिवसात लांजा नगर पंचायत हद्दीत सुरू करण्याचे आदेश दिले दरम्यान 80 एकर जागा दिल्यास मिनी एम आय डी सी ची लवकरच घोषणा करण्याचे निर्देश दिले. सोमवारी 2 तास उशिरा सुरू झालेल्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी सर्व खाते प्रमुख अधिकारी उपस्थित लांजा तालुक्यातील अनेक गावातील विकास कामांना पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली. 90 टक्के विविध अर्ज निवेदन यावर समाधानकारक उत्तरे देऊन ती मार्गी लागण्याचे आदेश दिले नगरपंचायत हद्दीत जिल्ह्यातील सर्व नगर पंचायत क्षेत्रात हॉकर्स झोन तयार करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले. कुवे येथील महामार्गबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई निधी वळविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रभानवल्ली श्री क्षेत्र बल्लाळ गणेश मंदिर ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून त्वरित 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला खोरनिनको धबधबा पाटबंधारे धरण येथे स्वच्छतागृह बांधण्यास मंजुरी देण्यात आली लांजा एसटी स्थानका च्या नवीन इमारत बांधकाम कामाबाबत तांत्रिक बाबी दूर करून त्वरित काम सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले लांजा ग्रामीण रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत आहे प्रसुतीगृह, शवविच्छेदन,एक्स रे,सर्पदंश, विंचू यांची लस उपलब्धता यावरून जनता दरबारात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

लांजा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पाटील याना समाधान कारक उत्तरे देता न आल्याने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जनता दरबार संपल्यावर खुद्द पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी श्री एम देवेदर सिह यांनी लांजा रुग्णालय ऑपरेशन थिएटरची पाहणी केली. यावेळी ओटी खोली सुस्थितीत असल्याचे दिसून आले. मात्र दुसऱ्या बाजूला एका खोलीत अस्वच्छता आणि अस्तव्यस्त सामान पडलेले होते ओटी असूनही कुटूंब नियोजन, प्रसूती का होत नाही, याची विचारणा करण्यात आली. सिव्हिल सर्जन यांना तातडीने जिल्हाधिकारी यांनी लांजात बोलवून घेण्यात आले. खुद्द कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्या शी संवाद साधला आणि आरोग्य सुविधा तक्रारी बाबत चांगले डोस दिले.

जिल्हाधिकारी यांनी 15 दिवसात येथील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले कुचराई करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनाअन्यथा कारवाई करण्याच्या सूचना केल्या जिल्हाधिकारी तासभर उभे राहून लांजा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधा बाबत विशेष लक्ष केंद्रित केले या कृतीबाबत लांजातील नागरिकांनि पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना धन्यवाद दिले. जनता दरबार ची तहसीलदार श्री प्रमोद कदम ,लांजा नगरपंचायत लांजा पंचायत समिती यांनी चांगली नियोजन केले होते. यावेळी उद्योजक श्री आण्णा सामंत शिंदे गटाचे राजू कुरूप ,नगराध्यक्ष मनोहर बाईत नगरसेवक सरपंच उपस्थित होते

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE