कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करताय? तपासून घ्या तुमच्या गाडीची वेळ!

१० जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू

रत्नागिरी : कोकणात कोसळणारा मुसळधार पाऊस लक्षात घेऊन मागील अनेक वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक लागू केली जाते. या कालावधीत बिगर पावसाळी वेळापत्रकाच्या तुलनेत अनेक गाड्यांच्या वेळेमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची वेळ तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून वेळोवेळी करण्यात आले आहे.

पावसाळी वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाडीने प्रवास करताना प्रवाशांनी आपल्या गाडीची वेळ तपासून घ्यायची आहे. आरक्षणावर तसे नमूदही केलेले असते. मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि शनिवारसारख्या घटना घडतात.

शनिवारी 10 जून रोजी कोकण रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांना लागू झाले. खरे तर पावसाळी वेळापत्रक हे कोकण रेल्वेसाठी नवीन नाही. तरीही जेव्हा हा बदल होतो तेव्हा प्रवासाला निघताना गाडीची सुधारित वेळ तपासून न घेतल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. असाच गोंधळ रत्नागिरीत शनिवारी मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या बाबतीत उडाला. यामुळे अप जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे जाणाऱ्या 50 हून अधिक प्रवाशांची ट्रेन चुकली.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रेल्वे कडून सुधारित वेळेचा एसएमएस येणे अपेक्षित आहे, तो न आल्यामुळे आमची गाडी चुकली. रत्नागिरी स्थानकावर घडलेले या प्रकारामुळे गाडी चुकलेल्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांशी उचलत घातली.

पावसाळी वेळापत्रक लागू व्हायच्या आधी जर कुणी कोकण रेल्वे मार्ग देणाऱ्या गाडीचे आरक्षण केले असेल, तर त्यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीची सुधारित वेळ तपासून घ्यायची आहे. मात्र अनेक प्रवासी या सूचनेकडे दुर्लक्ष करतात आणि असा गोंधळ उडतो. असा अनुभव याआधी देखील पावसाळी वेळापत्रक लागू झाल्याच्या पहिल्या दिवशी आलेला आहे.
शनिवारी अशाच गोंधळामुळे गाडी चुकलेल्या प्रवाशांचा अनुभव लक्षात घेता, जर कुणी कोकण रेल्वे मार्गे जाणाऱ्या गाडीचे आगाऊ आरक्षण केले असेल तर प्रवासाला निघण्याआधी त्यांनी का आपल्या गाडीची वेळ तपासून घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास तुमची देखील गाडी चुकू शकते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE