मुंबई -गोवा महामार्गावर खेडनजीक लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त

मुंबईच्या एक्साईज विभागाच्या पथकाची गुप्त माहिती आधारे कारवाई


रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील लवेल येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील विशेष पथकाने गुरुवारी (दि. 19 ) गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक पकडला आहे. या ट्रकमधून लाखो रुपयांच्या अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने खेड येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांयाना सोबत घेऊन गुरुवारी खेड तालुक्यातील लवेल गावानजीक सापळा रचला होता. गोवा बनावटीच्या दारूने भरलेला संशयित ट्रक लवेल येथे येताच अधिकार्‍यांनी ट्रक थांबवला. ट्रकची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये भरलेल्या हजारो खोक्यातून विदेशी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकातील अधिकार्‍यांनी गोवा बनावटीचे मद्याने भरलेले खोके जप्त करीत ट्रक व चालक यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कारवाई सुरू होती.

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर लवेल येथे एक्साईज विभागाच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतलेल्या गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह संशयित आरोपी.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE