सैतवडेच्या दि मॉडेल इंग्लिश स्कूलच्या शर्वरी शिर्के हिचा सत्कार

दहावी परीक्षेत मिळवले ९३ टक्के गुण!

रत्नागिरी : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेचा इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल लागला. संख्यात्मक निकालाबरोबरच गुणात्मक निकाल ही उत्कृष्ट लागल्याने या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांवर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या विद्यालयातील कु.शर्वरी शिर्के हिने ९३ टक्के गुण मिळवून सैतवडे केंद्रात व परिसरात प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यालयातील एकूण २९ विद्यार्थी परिक्षेस सहभागी झाले होते.


सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहिम माद्रे, उपाध्यक्ष गणी खतीब,जनरल सेक्रेटरी रुमान पारेख,खजिनदार शफी चिकटे, जॉईन सेक्रेटरी इलियास माद्रे सर्व पदाधिकारी ,सदस्य, माजी पदाधिकारी यांनी तसेच मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी अभिनंदन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE