कोकण रेल्वे मार्गावरील दोन विशेष गाड्यांना मुदतवाढ

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागपूर -मडगाव तसेच जबलपूर- कोईमतूर या लांब पल्ल्याच्या दोन विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार नागपूर ते मडगाव (01139) ही आठवड्यातून दोनदा धावणारी विशेष गाडी दि. ५ जुलै ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत धावणार आहे. मडगाव ते नागपूर मार्गावर (01140) दि. सहा जुलै ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

याचबरोबर जबलपूर ते कोईमतुर (02198) या मार्गावर आठवड्यातून एकदा जाणारी गाडी 29 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. परतीच्या मार्गावर असताना या गाडीला (02197) दिनांक 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE