देवरुख दि . १७ ( प्रतिनिधी ): नमो शेतकरी महा सन्मान निधी केंद्र सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६ हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर ४ महिन्यांच्या अंतरानं २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या ६ हजार रुपयांमध्ये आणखी ६ हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष १२ हजार रुपये मिळतील, अशी ही योजना आहे ? मात्र या योजनेचा लाभ घेणारे बोगस शेतकरी शोधण्याची गरज असल्याचे मत ॲड . यज्ञेश कदम यांनी व्यक्त केले आहे.
या योजनेची पुरेपूर प्रशिक्षण किंवा अभ्यास हा शासकीय कर्मचारी वर्गाला दिला जात नसल्यामुळे या योजना कोणाला द्यावयाच्या? कोण लोक यासाठी पात्र आहेत ? याची पुसटशीही कल्पना सरकारी कर्मचारी वर्गास नाही. केवळ सातबाऱरा उतऱ्यावर वर नाव आहे म्हणून तो शेतकरी अशी जर शेतकऱ्याची व्याख्या मान्य केली तर असे कितीतरी लोक स्वतः शेतकरी नसताना स्वतःला शेतकरी दाखवून शासनाच्या पैशाची लूट करतील व सद्यस्थितीत ते करत आहेत
ज्यांचा उदरनिर्वाह शेती या व्यवसायावर चालतो तो शेतकरी परंतु ज्याचा उदरनिर्वाह शेतीवर चालत नाही जे अन्य उद्योगधंदे करतात. मुंबई, पुणे सारख्या शहरात कामाला आहेत व केवळ सातबारावर स्वतःचं नाव आहे म्हणून ते शेतकरी कसे ? मग अशा बोगस लोकांना सर्वसामान्य लोकांच्या कामाचा पैसा योजनेच्या स्वरूपात का बरं द्यावा? ज्यांनी शेतकरी असल्याचे भासवून शासकीय योजनेची लाटण केली आहे त्यांच्यावर फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये असे मत ॲड . कदम यांनी व्यक्त केले आहे .
बोगस शेतकरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अनेक तालुक्यात आहेत जे खऱ्या शेतकऱ्यांचे ज्यांचा उदरनिर्वाह शेती या व्यवसायावर चालतो त्यांचा हक्क मारत आहेत शासनाने शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विकासकल्याण योजनांचा लाभ ते घेत आहेत या गावगुंडांना बोगस शेतकऱ्यांना वेळीच आवर घालणं अत्यंत गरजेचे तरच माझ्या शेतकरी बांधवाला खरोखर योजनांचा या लाभ मिळेल . या बोगस शेतकऱ्यांना शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही प्रशिक्षण देण्यात यावे व योजनेसाठी कोण खरोखर पात्र आहे याची एक नियमावली प्रसिद्ध करण्यात यावी तसेच यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी व बोगस शेतकऱ्यांवर योग्य कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळेल असेही ॲड . यज्ञेश कदम यांनी म्हटले आहे .
