रत्नागिरी-नागपूर महामार्ग नाणीजजवळ रस्ता
खचल्याने वाहने अडकली

लांजा-दाभोळे मार्गे पर्यायी वाहतूक


नाणीज, दि. ३० : रत्नागिरी -नागपूर महामार्ग काल रात्री नाणीज हायस्कुलजवळ खचला. त्यात एक ट्रक रुतून बसला. त्यामुळे सारी वाहने अडकून पडली. येथील रस्ता दुरुस्तीपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी वाहतूक लांजा- दाभोळेमार्गे सुरू करण्यात आली आहे.
या महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. रस्ता अनेक ठिकाणी उखडून ठेवला आहे. सध्या येथे जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रात्री १२.३० च्या दरम्यान हा रस्ता खचला. त्यात दोन वाहने रुतून बसली. ती बाजूला करण्यासाठी क्रेन आणण्यात आली तीही तिथे फसली.


या सर्व प्रकारामुळे सारी वाहने दुतर्फा अडकून पडली आहेत. रात्रीच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सारी छोटी वाहने चोरवणे मार्गे सोडण्यास सुरुवात केली आहे. मोठी वाहने मात्र जग्यावरच अडकून पडली होती. आता येथील रस्ता दुरुस्त होईपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक लांजा- दाभोळे कोल्हापूर अशी मार्गे वळविण्यात आली आहे.


महामार्गावर जे काम सुरू आहे, त्यांना पावसाचा अंदाज आला नाही. त्यांनी चुकीच्या पद्धतीने खोदाई केली आहे. त्यातून मूळ नाले बुजले गेले. त्यातून रस्ता खचण्याचा प्रकार घडल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. रात्रीपासून घटनास्थळी बघ्यांची गर्दी आहे. रस्त्यावर सारी माती वाहून आली आहे. त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. त्यातूंच माणसांना ये-जा करावी लागत आहे. अनेक वाहने घसरत आहेत. दुचाकीस्वार चिखलात पडत आहेत.

हेही वाचा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात ट्रक कलंडला

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE