गाडीवर पोलिस दिवा व पाटी लावून मिरवणारा तोतया सुशांत शिंदेवर गुन्हा दाखल

संगमेश्वर पोलिसांनी घेतले ताब्यात

देवरू़ख (सुरेश सप्रे) : सुशांत चंद्रकांत शिंदे (३६ रा. मिरा भाईंदर) याला बनावट नावाचा वापर कर तोतयागिरी केल्या प्रकरणी संगमेश्वर पोलीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार सुशांत चंद्रकांत शिंदे वय ३६ रा. मिरा भाईंदर याला पोलिस नसतानाही बनावट नावाचा वापर करत तोतयागिरी करण्यासाठी आपल्या ताब्यातील काँलिस गाडी नं. एम. एच. ०४-बी क्यु ६७८९ या गाडीवर अनधिकृतपणे पोलिस दिवा व उजव्याबाजूल पोलिस अशी अक्षर असलेली पाटी लावून फिरत असताना संगमेश्वर एस. टी. स्टँडजवळ येथे तोतयागिरी करताना आढळून आला. त्याला गाडीसह ताब्यात घेऊन त्याचेवर गुन्हा र. नं.५६/२०२४ भा.द.वि.कलम १७०.१७१ नुसार गुन्हा दाखल करून त्याला न्यायदंडाधिकारी देवरूख यांचे समोर हजर करण्यात आले.
त्याच्यावर स.पो. फौ. आर. ए. शेलार यांनी गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक गावित यांचे मार्गदर्शनखाली व्ही. व्ही. कोष्टी अधिक तपास करीत आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE