चिपळूण : येथील गोवळकोट भागातून कुंभार्ली इथे फिरायला गेलेले आणि वाशिष्टी नदी पात्रात बुडून बेपत्ता झालेल्या दोघे युवकांचे मृतदेह सोमवारी सायंकाळी बचाव पथकाच्या हाती लागले आहेत
चिपळूण शहरातून फिरायला गेलेल्या आठ मुलांपैकी कुंभार्ली नदीपात्रात उतरलेले दोन युवक बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळीघडलीहोती. बुडालेल्या या दोन्ही युवकांचा एन डी आर एफ सह स्थानिक बचाव पथकांकडून सोमवारी सायंकाळपर्यंत कसं शोध घेतला जात होता. अखेर सोमवारी सायंकाळच्या सुमारास या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत.
गोवळकोट रोड ता -चिपळूण येथील आठ मुले तीन दुचाकीवरून फिरण्यासाठी कुंभार्ली गावातील आशरकोंडा या नदीच्या ठिकाणी आले होते. या पैकी दोन मुले पाण्यात उतरली होती. वरच्या बाजूला पाऊस आल्यामुळे उर्वरित मुले ही झोपडीमध्ये आडोशाला उभी होती. नदीत उतरलेल्या मुलांचा बचाव बचाव असा आवाज आल्याने नदी काठावर असलेली मुले खाली आली. त्यावेळी दोन्ही मुलं जी पाण्यात होती ती बुडाल्याची त्यांच्या लक्षात आले.
पाण्यात बुडालेल्या मुलांमध्ये आतिक इरफान बेबल (वय 16 ते 17 ) व अब्दुल कादिर नौशाद लसाने (वय 17 ते 18
दोघेही राहणार चिपळूण शहर) या दोन युवकांचा समावेश होता. सोमवारी सायंकाळी या दोघांचेही मृतदेह हाती आले आहेत. या घटनेमुळे चिपळूणच्या गोवळकोट भागावर शोककळा पसरली आहे.
