एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची निवड

रत्नागिरी : एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी एड.प्रशांत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. रा. भा. शिर्के प्रशालेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रशांत जाधव यांचा सर्वांना परिचय आहे त्यांच्या विविधांगी कलागुणामुळे व प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे ते प्रसिद्ध आहेत. कोणतेही कार्य हाती घेतल्यास तडीस नेण्याच्या त्यांच्या गुणांमुळे त्यांची निवड करण्यात आल्याचे फाउंडेशन कडून सांगण्यात आले.

मायबाप बालसेवा फाउंडेशन चे मुख्य प्रवर्तक असलेले प्रशांत जाधव यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळ समाजसेवा व समाजकार्य केले आहे. दरम्यान एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन कडून देशभरात विविध व्यावसायीक कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रम आणि सुमारे 33 क्रीडा प्रकारातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सदर अभ्यासक्रम व क्रीडा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांना खुपच फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. क्रीडा प्रकारातील स्पर्धा बरोबरच व्यवसायिक अभ्यासक्रम देखील फाउंडेशन कडून सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी काळात तालुका जिल्हा व राज्य तसेच देश पातळीवर विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांची निवड चाचणी 20 जुलै पर्यंत घेण्यात येणार असल्याचे समजते सदर स्पर्धांमध्ये 12 ते 25 वयोगटातील कोणत्याही स्पर्धकांना नाममात्र प्रवेश फी आकारून सहभागी करून घेतले जाणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.या स्पर्धांमध्ये सध्या जुडो ,कराटे, तायक्वांदो,कुस्ती,बॉक्सिंग इत्यादी खेळांचा समावेश आहे.या संदर्भातील बैठक लवकरच घेण्यात येणार अअसून अधिक माहिती साठी 7058980759
या क्रमांकशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धीपत्रका द्वारे करण्यात आले आहे

हेही वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE