पुरामुळे चिपळूणसह खेडमधील शाळांना सुट्टी

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे खेड, चिपळूण तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली. खेडमध्ये जगबुडी नदीला तर चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला आलेल्या पुराचे आणि शहरातील सखल भागांमध्ये शिरले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे शाळेपर्यंत पोहोचणे कठीण बनल्याने चिपळूणसह खेड तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी जिल्हाधिकारी श्री. एम देवेंदर सिंह यांनी केली व संबंधित यंत्रणेला आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE