ट्रॅकवर पाणी आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

करमाळी-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस जवळपास चार तास रखडली; इतर काही गाड्यांना ही लेट मार्क

रत्नागिरी : गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकादरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे कोकण रेल्वे वाहतूक काही काळासाठी बाधित झाली. यामुळे सीएसटी ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस गुरुवारी साडेचार तास उशीर झाल्या होत. इतरही काही गाड्या विलंबाने धावत होत्या.

रुळावर पाणी आल्याने थांबलेल्या गाड्या थांबलेल्या गाड्या

  • १२०५१ मुंबई मडगाव जनशताब्दी १५:१६ पासून कुडाळ
  • २२११९ मुंबई मडगाव तेजस १५:४७ पासून सिंधुदुर्ग
  • २२११६ करमळी लोकमान्य टिळक टर्मिनस १६:२८ पासून झाराप
  • १२६१८ निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला १६:०५ पासून कणकवली
  • १२२१८ चंदीगड कोचुवेली संपर्क क्रांती १६:२६ पासून नांदगाव
  • १०१०५ दिवा सावंतवाडी १६:५१ पासून वैभववाडी
  • १०१०३ मुंबई मडगाव मांडवी १७:०६ पासून राजापूर

कोकण रेल्वेच्या कुडाळ तसेच सिंधुदुर्ग स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी आले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून याचवेळी या भागातून जाणाऱ्या काही गाड्या थांबवण्यात आल्या. यामध्ये करमाळी ते एलटीटी मार्गावर धावणाऱ्या एसी सुपरफास्ट गाडीचा समावेश होता. सुमारे चार तास उशिराने धावत होती. रेल्वे रुळांवरील पाणी ओसरल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वेची खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE