गोव्यात झालेल्या ओपन ब्रिज पेअर स्पर्धेत रत्नागिरीकरांची बाजी


रत्नागिरी : २१ आणि २२ जुलै रोजी गोवा ब्रिज असोसिएशन तर्फे ओपन ब्रिज पेअर स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचे खेळाडू श्री चिंतामणी दामले आणि श्री सचिन जोशी यांनी पहिला क्रमांक पटकावला. प्रत्येकी ८-८ बोर्डांचे एकूण ७ राऊंड घेण्यात आले. चिंतामणी दामले -सचिन जोशी यांनी सातही राऊंडमध्ये पहिला नंबर कायम ठेवला आणि पहिले आले.


त्याचप्रमाणे रत्नागिरीचे श्री. मोहन जोशी आणि बाळू मुळ्ये यांनी सदर स्पर्धेत सातवा नंबर पटकावला. या उज्वल यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE