कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या सन्मानार्थ उद्या दापोलीत सायकल फेरी

दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजन

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आलेले डॉ. संजय भावे हे कोकण कृषि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी याच विद्यापीठामधून अनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. गेली ३३ वर्षे ते या विद्यापीठात विविध पदांवर कार्यरत आहेत. सरांच्या कार्याला सलाम करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, ६ ऑगस्ट २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती केळस्कर नाका, बुरोंडी नाका, कुलगुरु निवास डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, पांगारवाडी जालगाव, वडाचा कोंड अशा ६ किमी मार्गावर असेल. समारोप आझाद मैदानात सकाळी ९:३० वाजता होईल. या सायकल फेरी दरम्यान कुलगुरु निवास येथे सरांची भेट घेऊन त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यात येईल सायकल फेरी झाल्यावर आझाद मैदानात सायकल दुरुस्ती, पावसाळ्यात सायकल चालवताना घ्यावयाची काळजी इत्यादीबद्दल माहितीपूर्ण छोटे सेशन होईल.

या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ९०२२८७४८८१ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE