रत्नागिरी शहर वाचनालयाच्या काव्यलेखन स्पर्धेत जान्हवी बोरवणकर प्रथम


रत्नागिरी : डॉ. मु. न. पानवलकर स्मृतीदिनानिमित्त रत्नागिरी शहर वाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत सौ. जान्हवी जयप्रकाश बोरवणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.


या बक्षीस समारंभ 5 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला .
मारुती मंदिर इथल्या शहर वाचनालयतर्फे ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात सुरवातीला डॉक्टरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला .
विमलाबाई पटवर्धन शहर वाचनालयाच्या अध्यक्ष सौ मोहिनी पटवर्धन यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमा विषयी थोडक्यात माहिती दिली.

या स्पर्धेत द्वितीय प्रा .सचिन सनगरे, तृतीय डॉ. अमेय श्रीराम गोखले यांनी पटकावले. उत्तेजनार्थ अन्वी अवधूत साळवी, साक्षी श्रीकांत बने, सौ. वैशाली हळबे यांना गौरवण्यात आले.
या स्पर्धेच परीक्षण केलेल्या गौतम बाष्टे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गौतम बाष्टे यांनी काव्यलेखना संबंधी आपले विचार मांडले.

मागे उभे डावीकडून सुप्रिया बेडेकर, शिल्पा पानवलकर, मेघना, अध्यक्ष मोहिनी डॉ. दिलीप पाखरे , गौतम बाष्टे गीता वैद्य आणि सरिता चाळके तर खाली बसलेले विजेते स्पर्धक
डावीकडून अन्वी साळवी, वैशाली हळबे, जान्हवी बोरवणकर, प्रा. सचिन सनगरे.


यावेळी सर्व यशस्वी स्पर्धकांनी कवितांचे वाचन केले.
सौ. शिल्पा पानवलकर यांचा नूतन लायन्स क्लब अध्यक्ष तसेच मेघना शहा यांचा खजिनदार म्हणून सत्कार करण्यात आला .शिल्पा पानवलकर यांनी डॉक्टर पानवलकर यांच्या हृद्य आठवणी सांगितल्या.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मेघना शहा यांनी केले .आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली .

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE