श्री संताजी जगनाडे महाराज सेवा संस्थेतर्फे विनायक राऊत यांचा सत्कार


रत्नागिरी, दि.०७ : गणपतीपुळे देवस्थान ट्रस्टचे सरपंच विनायक राऊत यांचा आज श्री संताजी जगनाडे महाराज सेवा संस्था रत्नागिरीचे अध्यक्ष संदीप उर्फ बावा नाचणकर यांच्या हस्ते गणपतीमुळे येथील त्यांच्या निवासस्थानी सपत्नीक सत्कार करण्यात आला.

विनायक राऊत यांचा सत्कार करताना श्री संताजी जगनाडे महाराज सेवा संस्था रत्नागिरीचे अध्यक्ष संदीप उर्फ बावा नाचणकर


विनायक राऊत हे गेली 13 वर्षे गणपतीपुळे ट्रस्टचे सेक्रेटरी म्हणून काम पहात होते. त्याचप्रमाणे मालगुंड एज्यूकेशन संस्थेचे गेली 25 वर्षे अविरतपणे सेक्रेटरी म्हणून ते काम पहात आहेत. ज्ञाती संस्थेतसुध्दा जबाबदारीने त्यांनी काम पाहिले आहे.


त्यांचा प्रशासनाचा दांडगा अभ्यास पाहून पंचानी नुकतेच त्यांना ट्रस्टचे अध्यक्ष म्हणजेच सरपंच म्हणून नियुक्त केले. यांच्या कार्याचा एक गौरव म्हणून श्रीसंताजी जगनाडे महाराज सेवा संस्था, रत्नागिरी तालुका यांच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष संदीप उर्फ बावा नाचणकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर पावसकर, सुरेश पावसकर, शरद कोतवडेकर, उदय बसणकर, तुळशीदास भडकमकर हे पदाधिकारी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE